Upcoming Event - 

Date - 27th May,2018

Place - Thane 

For - First Marriage - Age - 23 to 32

Preregistration compulsory.

 

एकरूप विवाह मंडळ आयोजित एक खास कार्यक्रम- " कांदेपोहे ते मंगलाष्टक " ब्राह्मण विवाहेच्छुकांसाठी – “जोडीदार निवडीची एक चुकवूच नये अशी संधी” रविवार दिनांक 15 मार्च रोजी, दादर येथे विवाहेच्छुकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला.  कार्यक्रमासाठी मुंबईच्या अनेक उपनगरातून विवाहेच्छुक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ३२ पर्यंतचाच वयोगट होता.

सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या एकरूप विवाह मंडळाचा हा असाच एक अतिशय नविन आणि प्रथमच लग्नाळू मुलामुलींच्या दृष्टीकोनातून तयार केलेली संकल्पना असलेला कार्यक्रम होता.

आजकाल मुलामुलींना एकमेकांशी स्वतंत्र भेटून लग्नाचा निर्णय घ्यायचा असतो,पण २,३ भेटीतूनही बरेचदा काहीच हाती लागत नाही. शिवाय ह्या सर्वांमुळे पालकही कायम चिंतेत असतात आणि इतके वेळा भेटूनही निर्णय “काहीच नाही” किंवा “पसंत नाही” हेच निष्कर्ष पाहून काहीसे हताशही होतात. अशा वेळी मुलामुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि सर्वात महत्वाच समजून घेण्याची आवश्यकता असते आणि हि वैचारिक देवाण घेवाण करणारी व्यक्ती पालक सोडून कुणीतरी असावे अशी मुलामुलींची इच्छा असते. एकरूप विवाह मंडळ आयोजित प्रस्तुत कार्यक्रमा अंतर्गत ह्याच गोष्टीवर  गोष्टींवर भर दिला गेला.

एकरूप विवाहच्या संचालिका सौ. अश्र्विनी पटवर्धन, ह्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, मुलांच्या मनातील कल्पना, त्यांचे विचार, त्यांची मते अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनातून काढून घेतले आणि मुलामुलींना बोलते केले.

एकरूप विवाह मंडळ आयोजित प्रस्तुत कार्यक्रमाचे स्वरूप, संकल्पना, आयोजन आणि सूत्रसंचालन सर्वांनाच अतिशय भावले. कार्यक्रमाची सांगता सर्वांना एकरूप विवाह मंडळा तर्फे एक छोटीशी भेट देऊन झाली. कार्यक्रमानंतर अल्पोपहारा दरम्यान भेटीगाठीसाठी वेळ देण्यात आला होता. 

काही निवडक प्रतिक्रिया -

  • पालकांशिवाय बोलण्याची मिळालेली संधी खूप आवडली.
  • असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत.
  • अपेक्षांबाबत concept  clear झाली.