सस्नेह नमस्कार !!

 


 

आम्हांला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !

प्रत्येक गोष्टीच्या सुरवातीमागे काहीतरी कारण असते, तसेच एकरूप विवाह मंडळच्या सुरवातीमागेही एक कारण आहे.माझं माहेर कल्याणच. आमच्या घरात वैद्यकीचा वसा. आजोबा,आजी आणि बाबा सर्वच डॉक्टर त्यामुळे समाजसेवेचा वारसा होताच माझ्यामागे,पण मला वैद्यकीय शास्त्राची तशी ओढ नव्हती, तरीही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मात्र होती. हि संधी मला माझ्या लग्नानंतर मिळाली.

माझे लग्न हे Arranged Marriageच. साधारण 6 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळची पद्धती आजच्या Arranged Marriage पद्धतीपेक्षा फार काही वेगळी नव्हती. फक्त दोन/ तीन भेटीतच आपल्या आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा, पण मला मात्र ह्या पद्धतीत अनेक कमतरता जाणवत होत्या, आणि माझ्या पालकांच्या मते हीच पद्धत अवलंबण्या शिवाय काही पर्याय नव्हता, पण मला ह्यावर काहीतरी उत्तम पर्याय हवा होता, माझ्यावेळेला तसा तो उपलब्धच नव्हता, मग तेव्हापासूनच ठरवलं कि मला ज्या अडचणी आल्या त्या माझ्या पुढच्या मित्र मैत्रिणींना येता कामा नयेत, म्हणूनच लग्नानंतर अवघ्या 6 वर्षातच मी माझं विवाह मंडळ स्थापन केलं. मला सांगायला अभिमान आहे कि एकरूप विवाह मंडळ ही महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणांसाठी कार्यरत असलेली एकमेव विवाह संस्था आहे. एकरूप विवाह मध्ये केवळ कोकणस्थ,देशस्थ,कऱ्हाडे व देवरूखे ब्राह्मण वधू वरांचीच नोंदणी होते.

माझ्या ह्या मंडळाचा प्रमुख उद्देशच हा आहे कि मुलामुलींना जोडीदार निवडीसाठी सर्वोतोपरी मार्गदर्शन करणे, जोडीदार निवडीसाठी एक अतिशय उपयुक्त असे त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे.तसेच पालक आणि मुलेमुली ह्यांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करायचेआहे.

माझ्या ह्या मंडळाच्या माध्यमातून आणि पालकांच्या व मुलामुलींच्या समन्वयाने एका उत्तम एकरूप संसाराची मुहूर्तमेढ रोवली जावी हिच सदिच्छा.

सौ. अश्र्विनी पटवर्धन – संचालिका एकरूप विवाह मंडळ